Personal Loan For Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना 30-40 हजार रू कर्ज मिळणार! अजित पवार यांची घोषणा

Personal Loan For Ladki Bahin Yojana

587

लाडक्या बहिणींना 30-40 हजार रू कर्ज मिळणार!

Personal Loan For Ladki Bahin Yojana

Personal Loan For Ladki Bahin Yojana : बारामती येथी एका सोहळ्यात अट सुवर्ण यांनी एक महत्वाचे माहिती दिली, हि माहिती भू चर्चित लाडकी बहीण योजने बद्दलची आहे.   लाडक्या बहिणींना लघुउद्याोग सुरू करण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. या कर्जाचे हप्ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वळते केले जाऊ शकतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते बारामतीतील मुढाळे येथील विद्याुत उपकेंद्राचे भूमिपूजन झाले. त्या वेळी ते बोलत होते. चाल तर या बद्दल पूर्ण माहिती बघूया 

Ladki Bahin 50 Thousand Loan

App Download Link : Download App

 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर ४५ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडत आहे. मात्र, गोरगरीब महिलांना पैसे मिळत असल्याने त्यांना उपयोग होत आहे. दोन कोटींहून अधिक महिलांना याचा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होत आहे. आता महिलांना लघुउद्याोग सुरू करण्यासाठी ५० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. त्याचे हप्ते हे या योजनेतून वळते केले जातील,’ असे अजित पवार म्हणाले.

‘महायुती सरकारने सौर ऊर्जा पंप योजना आणली आहे. या योजनेतून सुमारे आठ लाख आठ हजार शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात आले आहेत. या योजनेसाठी २४ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत आतापर्यंत एक लाख ३० हजार घरांसाठी ५०० मेगावॉटपेक्षा जास्त क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा संच दिले आहेत. या योजनेसाठी १ हजार कोटींपेक्षा जास्त अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले आहे,’ असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

Personal Loan For Ladki Bahin Yojana