MPSC Group C Result 2025 – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर
MPSC Group C Result 2025 – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल 06 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा 01 जून 2025 रोजी घेण्यात आली होती. सदर निकालामध्ये मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (बैठक क्रमांकासह) आणि गुणांची सीमारेषा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

For daily updates on NMK 2025 job vacancies, latest MajhiNaukri notifications, and government jobs through MahaSarkar, visit our dedicated pages. Get real-time alerts from MahaRojgar Bharti, trending opportunities on MahaBharti, and free job alerts for Maharashtra students at Free Job Alert.
📢 निकालाची मुख्य वैशिष्ट्ये – MPSC Group C Prelims 2024
- परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
- परीक्षा दिनांक: 01 जून 2025
- निकाल जाहीर होण्याची तारीख: 06 ऑगस्ट 2025
- मुख्य परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी आणि कटऑफ प्रसिद्ध
- अधिकृत संकेतस्थळ: https://mpsc.gov.in
📌 पुढील टप्प्यात काय?
पूर्व परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार आता मुख्य परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. केवळ पात्र उमेदवारांनीच विहित कालावधीत मुख्य परीक्षेचा फॉर्म भरावा आणि परीक्षा शुल्क अदा करावे.
टीप: पूर्व परीक्षेतील निकाल हा उमेदवारांनी अर्ज करताना दिलेल्या माहितीस अधीन आहे. पात्रता पडताळणी मुख्य परीक्षा किंवा त्यानंतरच्या टप्प्यांमध्ये होईल.
🔍 महत्वाच्या सूचना
- आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
- मुख्य परीक्षा दिनांक २१ सप्टेंबर, २०२५ रोजी घेण्यात येईल.
- ही निकालसूची विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायप्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.
- मुख्य परीक्षेस पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क विहित मुदतीत व पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा उमेदवारास मुख्य परीक्षेस पात्र मानले जाणार नाही.
- पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील माहिती व दावेच मुख्य परीक्षेस ग्राह्य धरले जातील.
📝 नियमित अपडेटसाठी आमच्या WhatsApp आणि Telegram चॅनेलला नक्की जॉईन करा.
Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App
सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग दररोजचे NMK 2025 अपडेट्स, नवीन MajhiNaukri जाहिराती, आणि अधिकृत MahaSarkar संकेतस्थळावरील भरती माहिती मिळवण्यासाठी आमच्या या पेज ला नक्की भेट द्या. MahaRojgar च्या माध्यमातून ताज्या नोकरी संधी, MahaBharti वरील चालू भरती माहिती आणि Free Job Alert वर मोफत नोकरी सूचना मिळवा. योग्य संधी गमावू नका — प्रत्येक अपडेट तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
📄 निकाल तपासण्यासाठी आवश्यक लिंक्स
महत्त्वाच्या लिंक्स – MPSC Group C Result 2025 | |
---|---|
📢 निकाल PDF (बैठक क्रमांकासह) & 🎯 गुणांची सीमारेषा | डाउनलोड करा |
🌐 अधिकृत संकेतस्थळ | MPSC Website |
📱 WhatsApp Channel | Join WhatsApp |
📢 Telegram Channel | Join Telegram |
Follow Instagram |