Maharashtra TAIT Result 2025 – महाराष्ट्र TAIT निकाल जाहीर

94

Maharashtra TAIT Result 2025 – महाराष्ट्र TAIT निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025 चा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेस एकूण 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 2,11,308 उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला हजर झाले. व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांचा निकाल 18 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.


For daily updates on NMK 2025 job vacancies, latest MajhiNaukri notifications, and government jobs through MahaSarkar, visit our dedicated pages. Get real-time alerts from MahaRojgar Bharti, trending opportunities on MahaBharti, and free job alerts for Maharashtra students at Free Job Alert.


🔹 Key Highlights (मुख्य ठळक बाबी)

घटना माहिती
परीक्षेचे नाव शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) 2025
नोंदणीकृत उमेदवार 2,28,808
प्रत्यक्ष हजर 2,11,308
निकाल प्रसिद्ध होण्याची तारीख 18 ऑगस्ट 2025
अधिकृत संकेतस्थळ www.mscepune.in



शासन शुध्दीपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टिएनटि-१, दिनांक ०२/०५/२०२५ अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत सादर करणेबाबत या कार्यालयाच्या दिनांक १६/०७/२०२५ रोजीच्या प्रसिध्दी निवेदना‌द्वारे प्रसिध्दी देण्यात आली होती. सदर परीक्षेस एकूण २२८८०८ परीक्षार्थी / उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परोक्षस एकूण २११३०८ प्रविष्ठ झाले होते.

त्यापैकी बी.एड. परीक्षेचे १५७५६ Appear व डी.एल.एड. परीक्षेचे १३४२ Appear असे एकूण १७०९८ विदयार्थी/उमे‌द्वारांनी Appear म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. तरी दि. १४/०८/२०२५ अखेर बी.एड. परीक्षेचे ९९५२ व डी.एल.एड. परीक्षेचे ८२७ असे एकूण १०७७९ Appear विदयार्थी उमे‌द्वारांची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे. अशा विद्यार्थ्यांचा /उमेद्वारांचा निकाल प्रसिध्द करण्यात येईल.

तथापि ज्या विदयार्थी/उमे‌द्वारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयास अ‌द्यापपर्यंत सादर केलेले नाही अशा उर्वरित बी.एड. परीक्षेचे ५८०४ व डी.एल.एड. परीक्षेचे ५१५ अशा एकूण ६३१९ Appear वि‌द्यार्थ्यांचा उमे‌द्वारांचा निकाल राखीव ठेवण्यात येईल.

तरी ज्या वि‌द्यार्थ्यांनी/उमे‌द्वारांनी अ‌द्यापपर्यंत https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppear.aspx या लिंकमध्ये माहिती विहित मुदतीत सादर केली नाही अशा विदयार्थी/उमेद्वारांनी दिलेल्या लिंक‌द्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विदयार्थी/उमे‌द्वारांची राहिल तद्‌नंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व विदयार्थी/उमे‌द्वारांनी नोंद घ्यावी.

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार दि. १८/०८/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

📊 TAIT 2025 परीक्षा आकडेवारी

विभाग उमेदवारांची संख्या
नोंदणीकृत (Total Registered) 2,28,808
प्रत्यक्ष हजर (Appeared) 2,11,308
B.Ed. Appeared 15,756
D.El.Ed. Appeared 1,342
निकालासाठी पात्र 10,779 (B.Ed. – 9,952, D.El.Ed. – 827)
निकाल राखीव 6,319 (B.Ed. – 5,804, D.El.Ed. – 515)

📝 महत्त्वाची सूचना

  • ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.
  • अद्याप प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांनी या लिंकवर माहिती सादर करणे आवश्यक आहे.
  • विहित मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही अर्जांचा विचार केला जाणार नाही.

📅 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

घटना तारीख
निकाल प्रसिद्ध होण्याची तारीख 18 ऑगस्ट 2025

🔗 Important Links (महत्त्वाचे दुवे)

विवरण लिंक
निकाल पाहण्यासाठी Click Here
माहिती सादर करण्यासाठी लिंक Submit Here

निष्कर्ष : महाराष्ट्र TAIT निकाल 2025 सोमवार, 18 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. सर्व पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल तपासावा. प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांचा निकाल राखीव राहील.

Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App 

सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग दररोजचे NMK 2025 अपडेट्स, नवीन MajhiNaukri जाहिराती, आणि अधिकृत MahaSarkar संकेतस्थळावरील भरती माहिती मिळवण्यासाठी आमच्या या पेज ला नक्की भेट द्या. MahaRojgar च्या माध्यमातून ताज्या नोकरी संधी, MahaBharti वरील चालू भरती माहिती आणि Free Job Alert वर मोफत नोकरी सूचना मिळवा. योग्य संधी गमावू नका — प्रत्येक अपडेट तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

MPSCTestSeries.in

वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.