महानिर्मितीच्या भरती परीक्षेत गैरप्रकार !!

MahaGenco Recruitment Update, Result, Merit List

0

MahaGenco Recruitment Update, Result, Merit List

महानिर्मिती कंपनीच्या कनिष्ठ अधिकारी पदासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. डमी व्यक्तीने स्पाय कॅमेरा आणि ब्ल्यूटूथ अशा साधनांच्या माध्यमातून पेपर दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. परीक्षेत पात्र झालेल्या परीक्षार्थीच्या पडताळणीत ही फसवणूक लक्षात आली असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात छत्रपती संभाजीनगर येथील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत रतनसिंग जारवाल (रा. बोंबल्याची वाडी, पो. खोंडेगाव, ता. जि. संभाजीनगर), सौरभ हिरालाल जारवाल (रा. संजापूरवाडी, पो. पारसोडा, ता. वैजापूर) व त्यांचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत योगेश सावकार (रा. इंदिरानगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. महानिर्मिती कंपनीच्या वतीने कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. गेल्या शुक्रवारी नाशिकमधील पुणे विद्यार्थीगृहाच्या कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग येथे परीक्षा पार पडली. या परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांच्या यादी तपासणीच्या वेळी हा प्रकार समोर आला आहे. संशयितांनी डमी इसम बसवून परीक्षा दिल्याचे निदर्शनास आले आहे. उमेदवारीचा ऑनलाइन अर्ज भरतानाच्या व पात्र झालेल्या उमेदवाराच्या छायाचित्रात तफावत आढळून आला.

 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

निवड यादी पहा

 

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.