BARTI Maharashtra Bharti 2025 । ‘बार्टी’ मधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबै बँक देणार ५ लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज !!

BARTI Maharashtra Bharti 2025

348

BARTI Maharashtra Bharti 2025 : बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) मधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबै जिल्हा बँक ५ लाखांपर्यंत बिनव्याजी शैक्षणिक कर्ज देणार असल्याची घोषणा मुंबै बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी केली. मुंबै बँकेच्या फोर्ट येथील मुख्य कार्यालयात बार्टीद्वारे प्रशिक्षण घेऊन (आयआयटी) (एनआयटी) मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबै बँकेचे शैक्षणिक कर्ज देण्यासाठी भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आ. दरेकर बोलत होते.

BARTI Maharashtra Bharti 2025

या समाजातील मुलांना शिक्षणासाठी अत्यल्प व्याजदरात कर्ज कसे देता येईल, याबाबत शासन स्तरावर धोरण आणू, अशी ग्वाही देताना बार्टीमधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देऊ, तसा निर्णय आमच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेऊ, असा विश्वासही दरेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. मुंबै बँक शिक्षणासाठी, शिक्षणाच्या कर्जासाठी नेहमीच आग्रही राहिली आहे. बार्टीला मुंबै बँकेकडून जेवढे सहकार्य लागेल तेवढे केले जाईल.

App Download Link : Download App

विद्वत्ता म्हटले की समोर नाव बाबासाहेबांचे येते. केवळ बाबासाहेबांची लेकरं म्हणून चालणार नाही, बाबासाहेबांच्या विचारांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे आदर्श घेतले तर आपण यशस्वी होऊ, असे सांगून दरेकर म्हणाले, माझ्यावर बाबासाहेबांच्या विचारांचा वेगळा पगडा आहे. जेव्हा समाजाचा विषय येतो, त्यावेळी मी एक पाऊल पुढे टाकून मदतीसाठी सरसावतो. जे आमच्या हातात आहे ते आम्ही तत्काळ करू. सरकारची मदत लागेल त्यासाठी शासनस्तरावर बैठक घेऊ. मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला तर त्यांच्याकडेही बैठक घेऊ, असे दरेकर म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे समाजातील मुले वेगवेगळ्या हुद्यावर नावलौकिक कमावत आहेत. या समाजातील मुलांनी पुन्हा बाबासाहेबांचे शक्तीस्थान असलेले ‘शिक्षण’ कमवावे आणि आपल्या कुटुंबाच्या भल्याबरोबर समाजाचे भले करावे, अशी अपेक्षा दरेकरांनी व्यक्त केली.

 

Important Links For BARTI Pune Recruitment 2025

📑 PDF जाहिरात- 1 Notification PDF
👉 ऑनलाईन अर्ज करा Apply
✅ अधिकृत वेबसाईट Official Website

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram