एमपीएससी EKYC प्रक्रिया सुरू – आता अर्ज करण्याआधी ‘ओळख पडताळणी’ अनिवार्य!

210

MPSC KYC प्रक्रिया सुरू झाली आहे – उमेदवारांनी लवकरात लवकर पूर्ण करा | MPSC Recruitment 2025

एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. E-KYC प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून, आता कोणतीही परीक्षा अर्ज करण्यापूर्वी आधार-आधारित केवायसी (KYC) पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

For daily updates on NMK 2025 job vacancies, latest MajhiNaukri notifications, and government jobs through MahaSarkar, visit our dedicated pages. Get real-time alerts from MahaRojgar Bharti, trending opportunities on MahaBharti, and free job alerts for Maharashtra students at Free Job Alert.

MPSC KYC Updates
MPSC KYC Updates

बनावट उमेदवार आणि परीक्षेतील फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हे कठोर पाऊल उचललं आहे. यानुसार, MPSC पोर्टलवर अर्ज करताना सर्वप्रथम तुमचं KYC व्हेरिफिकेशन पूर्ण झालं पाहिजे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचा अर्ज सरळ नाकारला जाणार आहे.

आयोगाने स्पष्ट सांगितलं आहे की उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी. याआधी २०१७ पासून आधार क्रमांक पर्यायी ओळख म्हणून वापरण्याची मुभा होती. मात्र आता UIDAI कडून भरती प्रक्रियेसाठी आधार-आधारित पडताळणीला अधिकृत मान्यता मिळाल्याने आयोगाने ही प्रक्रिया अधिक सक्त केली आहे.

EKYC साठी उमेदवारांनी आपली प्रोफाइल अनलॉक करून आधार क्रमांक (जो मोबाईलशी संलग्न आहे) भरावा लागेल. ज्या उमेदवारांच्या आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक आहे, त्यांनी KYC विषयी काळजी करण्याची गरज नाही – कारण ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. EKYC पर्याय तुमच्या अर्ज करताना आपोआप दिसेल.

मात्र ज्या उमेदवारांचा आधार क्रमांक मोबाईलशी लिंक नाही, त्यांनी तो आधी लिंक करून घ्यावा किंवा आयोगाच्या कार्यालयाला भेट द्यावी.

आयोगाचं अधिकृत निवेदन काय सांगतं?

आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अर्ज स्वीकारण्यासाठी EKYC प्रक्रिया अनिवार्य आहे. ही प्रक्रिया फक्त एकदाच करावी लागणार आहे. उमेदवाराचं एकच प्रोफाइल सक्रिय ठेवण्यात येईल आणि अन्य खाती निष्क्रिय मानली जातील.

या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता आणि अपात्र उमेदवारांची नोंद रोखली जाईल. त्यामुळे पात्र उमेदवारांना संधी मिळेल, असा आयोगाचा विश्वास आहे. आयोगाने सगळ्या उमेदवारांना आवाहन केलं आहे की त्यांनी वेळेवर EKYC प्रक्रिया पूर्ण करून आपली तयारी अडथळ्याशिवाय सुरू ठेवावी.

EKYC का आवश्यक आहे?

एमपीएससीने ही पद्धत बनावट उमेदवारांना रोखण्यासाठी आणि परीक्षेची पारदर्शकता टिकवण्यासाठी लागू केली आहे. UIDAI ने आधार-आधारित ओळख पडताळणीला अधिकृत मान्यता दिल्यामुळे आयोगाने ही प्रक्रिया अधिक कठोर केली आहे.

ऑनलाइन EKYC प्रक्रिया कशी पूर्ण करावी?

  1. https://mpsc.gov.in/home या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  2. One Time Registration (OTR) प्रक्रिया पूर्ण करा.
  3. प्रोफाइल किंवा अर्ज करताना EKYC पर्याय निवडा.
  4. तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि आवश्यक ओळखपत्र तपशील भरा.
  5. मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून पडताळणी पूर्ण करा.
  6. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पर्याय निवडून EKYC प्रक्रिया पूर्ण करा.

नवीन नियमानुसार आधार क्रमांक लिंक असणं आवश्यक का?

आता अर्ज करताना दिलेला मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं अत्यावश्यक आहे. एकदा ओळख पडताळणी पूर्ण झाली की उमेदवार फक्त एकच Active खाते वापरू शकतो.

जर एकापेक्षा जास्त किंवा डुप्लिकेट खाती असतील, तर ती आपोआप Deactivate केली जातील. EKYC फक्त अर्ज करतानाच नाही तर परीक्षा केंद्रावरही आधार आधारित पडताळणी केली जाणार आहे.

यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होईल.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे:

  • EKYC ही एकदाच करावी लागते.
  • केवळ एकच प्रोफाइल वापरणं बंधनकारक आहे.
  • बनावट नोंदणी, फसवणूक यांना पूर्णपणे आळा बसेल.
  • पात्र उमेदवारांना न्याय्य संधी मिळेल.
  • ही प्रक्रियाअत्यंत सोपी आणि जलद आहे.

MPSC उमेदवारांसाठी अंतिम सूचना

आयोगाच्या या नव्या निर्णयामुळे फसवणुकीला आळा बसेल आणि पात्र उमेदवारांनाच संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांनी लवकरात लवकर EKYC पूर्ण करून पुढील प्रक्रियेसाठी सज्ज व्हावं.

जर तुमचा आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असेल, तर EKYC करताना काहीही अडचण येणार नाही. अर्ज करतानाच EKYC चा पर्याय दिसेल. जर मोबाईल क्रमांक लिंक नसेल, तर तो आधी लिंक करून मगच EKYC करा.

ताज्या अपडेट्ससाठी खालील लिंक वापरा:

🔔 अन्य महत्वाच्या भरती:

💡 टीप: EKYC करता आधार मोबाईलशी लिंक नसेल तर जवळच्या UIDAI केंद्रावर जाऊन आधी लिंक करून मगच अर्ज करा.

Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App 

WhatsApp/Telegram अपडेटसाठी जॉईन व्हा!

👉सर्व नवीन  भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये लगेचच सहभागी व्हा:

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

मित्रांनो नवीन जाहिराती खालील लिंक वर पाहू शकता. 

MahaBharti 2025 – महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकऱ्या एकाच ठिकाणी

MajhiNaukri | माझी नोकरी – नवीन शासकीय भरती 2025

Mahanews – महाराष्ट्रातील सर्वात वेगवान सरकारी बातम्या आणि अपडेट्स 2025

MahaRojgar – महाराष्ट्रातील सर्व शासकीय नोकरी अपडेट्स एकाच ठिकाणी

 

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

MPSCTestSeries.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Table of Contents