Maharashtra SSC Board Result 2025 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, इथे पाहा थेट लिंक
Maharashtra SSC Result 2025 | दहावीचा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता
Maharashtra SSC Board Result 2025 : दहावीचे विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी मोठी बातमी! महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) मार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी, 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.
Maharashtra SSC Board Result 2025: पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.
📢 निकाल जाहीर होण्याची वेळ आणि ठिकाण
- निकालाची तारीख: 13 मे 2025 (मंगळवार)
- वेळ: दुपारी 1 वाजता
- अधिकृत संकेतस्थळे:

📲 SSC निकाल ऑनलाइन कसा पाहाल?
- वर दिलेल्या संकेतस्थळांपैकी कुठल्याही एका लिंकवर क्लिक करा.
- तुमचा Seat Number आणि Mother’s First Name टाका.
- ‘Submit’ किंवा ‘View Result’ बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा PDF स्वरूपात सेव्ह करा.
App Download Link : Download App
📄 शाळांमधून गुणपत्रिका कधी मिळणार? Maharashtra SSC Board Result 2025
ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमधून अधिकृत गुणपत्रिका (Marksheet) वाटप करण्यात येईल. गुणपत्रिका शाळांमध्ये उपलब्ध झाल्यानंतर त्याची माहिती संबंधित शाळा देईल.
🎓 अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन
निकालानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रेचा प्रश्न निर्माण होतो. यंदा महाराष्ट्र बोर्डानं अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. अधिकृत वेबसाइटवर लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.
✅ महत्वाची सूचना
निकाल पाहताना संकेतस्थळावर एकाच वेळी अनेक जण येत असल्यामुळे थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. कृपया संयम ठेवा आणि अधिकृत संकेतस्थळावरच निकाल पाहा.
📢 ही महत्त्वाची माहिती इतर विद्यार्थ्यांसोबत WhatsApp व Telegram वर शेअर करा.
🎯 आणखी अपडेट्ससाठी भेट द्या 👉 www.mpsctestseries.in