MPSC Group C Result : ‘एमपीएससी’च्या इतिहासातील सर्वात मोठ्या भरतीचा निकाल जाहीर, ७ हजार उमेदवारांना सरकारी नोकरी; पाहा यादी
MPSC Group C Result
MPSC Group C Result
MPSC Group C Result : गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी एमपीएससी गट-क परीक्षा २०२३ च्या निकालाची वाट पाहत होते. अखेर त्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ मधील ‘लिपिक-टंकलेखक’ व ‘कर सहायक’ या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी स्वतंत्ररीत्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. मॅटच्या निकालानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
पदाचे नाव & तपशील: लिपिक टंकलेखन व कर सहायक
MPSC group c exam result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३- लिपिक टंकलेखन व कर सहायक संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या गुणवत्ता याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. एमपीएससीच्या इतिहासातील सर्वात जास्त पदांच्या भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या जाहिरातीतून ७ हजारांपेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या निकालावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे हे प्रकरण मॅटममध्ये गेले होते. अखेर आजच्या मॅटच्या निकालानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३, ‘लिपिक-टंकलेखक’ व कर सहायक’ संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर-
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ मधील ‘लिपिक-टंकलेखक’ व ‘कर सहायक’ या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी स्वतंत्ररीत्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. दोन्ही सर्वसाधारण गुणवत्ता याद्या या निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाच्या असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो. प्रस्तुत दोन्ही सर्वसाधारण गुणवत्ता याद्या मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे.
App Download Link : Download App
महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३, ‘लिपिक-टंकलेखक’ व कर सहायक’ निकाल-
Important Links For MPSC Group C Result |
|
📑 Result PDF |
Result PDF |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
MPSC Group C Result