जिल्हा परिषद पदभरती निकाल आठ दिवसात लागणार!

ZP Bharti result 2023

0

ZP Bharti result 2023 – Zilla Parishad Group-C Direct Service Recruitment-2023 was scheduled to conduct the examination of 30 cadres. Accordingly, the examinations of 25 cadres have been completed by the end of 26.12.2023. Out of the total 25 cadres that were examined, the cadre “Livestock Supervisor” was Hon. As it comes under the cadre directed by the Supreme Court, the process of preparing and announcing the results of other 24 cadres excluding this cadre should be started immediately by contacting the Chief Executive Officer of the concerned Zilla Parishad under ZP Bharti result 2023. A circular to this effect has been published, and the movement for the results has started soon.

ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या विविध रिक्त जागांसाठी नुकतीच ऑनलाइन स्वरूपाची परीक्षा घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील ८७५ जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अजूनही प्रलंबित आहे. आठ दिवसांत याचा निकाल सादर करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी दिले आहे.

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या ८७५ जागांसाठी जिल्ह्यातील ८८ हजार ७५२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या परीक्षेसाठी राळेगाव केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ७ ऑक्टोबर ते २६ डिसेंबर या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या ऑनलाइन स्वरूपाच्या परीक्षा घेण्यात आल्या.

 

आयबीपीएस या कंपनीने ऑनलाइन स्वरूपाची ही परीक्षा संपूर्ण राज्यभरात घेतली. मात्र, परीक्षेचा निकाल अजूनपर्यंत लागला नव्हता. यामुळे राज्यभरात विविध चर्चाना उधाण आले होते. या संदर्भात ग्रामविकास विभागाचे सचिव डवले यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. यावेळी राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या एकूण उमेदवारांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी आयबीपीएस या कंपनीला परीक्षेचा निकाल पुढील आठ दिवसांमध्ये सादर करण्याच्या सूचना दिल्या. ही कंपनी परीक्षेचा निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे. यानंतर जिल्हा परिषद त्यांच्या पोर्टलवर मेरिट यादीनुसार निकाल जाहीर करणार आहे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उमेदवारांच्या निकालाची यादी लावणार आहे. यामुळे पुढील आठ दिवसांनंतर उमेदवारांचा परफॉर्मन्स कळणार आहे. यानंतर बेरोजगारांपुढील नोकरीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे. यामुळे निकालासंदर्भात उठणाऱ्या वावड्या थांबणार आहे.

 

या जागांसाठी झाली आहे परीक्षा
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ साहाय्य लेखाविस्तार अधिकारी, सांख्यिकी विस्तार अधिकारी, कृषी, आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक निम्न श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी, वरिष्ठ सहायक लेखा, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता, यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत, तारतंत्री, जोडारी, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी शिक्षण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी पंचायत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, बांधकाम, लघुसिंचन, पाणीपुरवठा, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक लिपिक, औषधनिर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या विविध पदांच्या परीक्षेचा निकाल यामध्ये समाविष्ट आहे. तर पेसा क्षेत्रातील काही जागांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे.

जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती-२०२३ च्या अनुषंगाने ३० संवर्गाच्या परीक्षा घेण्यात आल्या. या भरती परीक्षेचे निकाल लवकरच जाहीर होणार आह. या संदर्भातली परिपत्रक प्रकशीत झाले आहे. तसेच दि.२६.१२.२०२३ अखेर एकूण २५ संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत. परीक्षा झालेल्या एकूण २५ संवर्गापैकी “पशुधन पर्यवेक्षक” हा संवर्ग मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर २४ संवर्गाचे निकाल तयार करुन घोषित करणेची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावी. या आशयाचे परिपत्रक प्रकाशित झाले असून, लवकरच निकालाच्या हालचाली सुरु झाल्या आहे. या  भरतीचा पुढील अपडेट लवकरच येईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.