जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती

Zilha Parishad Recruitment 2022

0

Zilha Parishad Recruitment 2022

ZP Bharti 2022 updates for 13000 posts Group C:जिल्हा परिषदेच्या एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार जिल्हा परिषदेअंतर्गत गट क ची १३ हजार पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. ZP मध्ये आरोग्य कर्मचारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध उत्पादक आणि आरोग्य पर्यवेक्षक इत्यादी पदे भरणे आवश्यक आहे, उमेदवारांनी ZP गट C भारती 2022 तपशीलांसाठी खालील लेख वाचा:

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग अहमदनगर येथे ५८२ पदे रिक्त

जिल्हा परिषदेतील ग्रुप क संवर्गाची १३००० पदे लवकरच भरणार

 

ZP Bharti 2022 Latest updates for 10127 posts :राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.

आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या नव्या तारखा

जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती

  1. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे.
  2. पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार आलेल्या अर्जातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.  पाच संवर्गासाठी एकूण चार लाख अर्ज प्राप्त झाले असून या  अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
  3. आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गातील मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुधारित आकृतीबंधास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

ZP Bharti 2022- Vacancy Details 

आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकाची ४७ पदे, औषध निर्मात्याची ३२४ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ९६, आरोग्य सेवकाची तीन हजार १८४ पदे आणि आरोग्य सेविकांची सहा हजार ४७६ पदे अशी एकूण १० हजार १२७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.