महाराष्ट्र वन विभाग भरती वेळापत्रक जाहीर | Maharashtra Van Vibhag Bharti Time Table 

Van Vibhag Bharti 2023 Time Table Schedule

0

Maharashtra Van Vibhag Bharti Time Table 

Van Vibhag Bharti 2023 Time Table Schedule :  वन विभाग भरती ची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी. वन विभाग भरती 2023 साठी संपूर्ण टाईम टेबल वेळापत्रक जाहीर झाले आहे. फॉरेस्ट वन विभाग भरती 2023 साठी शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. वन विभाग भरती संपूर्ण टाईम टेबल व वेळापत्रकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा. 

भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दि. ४/५/२०२२ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या आहेत. आता सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय दिनांक २१/११/२०२२ अन्वये भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याताना यापुढे स्पर्धा परिक्षा टि.सी.एस.- आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिनिटेक) व आय.बी.पी.एस. (इंस्टिट्युट ऑफ बैंकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ऑनलाईन पध्दतीने स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी यापैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार निवड करावयाची आहे. तसेच सदर शासन निर्णयान्वये परीक्षा शुल्क, कंपनीशी करावयाचा सामंजस्य करार याबाबतच्या सुधारीत तरतुदी दिलेल्या आहेत..

२. त्यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१ / ११ / २०२२ च्या शासन निर्णयातील कार्यपध्दती / तरतुदी यांची तपासणी करुन भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करणेबाबत शासनाने संदर्भ ३ वरील पत्रान्वये सुचीत केले आहे..

३. उपरोक्त सुचनांचे अनुषंगाने कळविण्यात येते की, वनविभागातील सरळसेवेने भरती करावयाच्या पदांची यादी यासोबत जोडली आहे. सदर पदांपैकी ज्या संवर्गाची बिंदूनामावली मुख्य वनसंरक्षक (प्रा.) / वनसंरक्षक (प्रा.) किंवा त्यांचे अधिनस्त वनविभाग स्तरावर आहे त्या संवर्गाची भरती प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ४/५/२०२२ व दिनांक २१/११/२०२२ मधील सुचनांचे अनुषंगाने राबविणेकरीता खालीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम आखून देण्यात येत आहे.

वन विभाग भरती 2022 – 23 वेळापत्रक | Maharashtra Van Vibhag Bharti Time Table 

 
1) जाहिरात प्रसिद्ध करणे – 20 डिसेंबर 2022
 
2) अर्ज स्वीकारणे – 31 डिसेंबर 2022
 
3) ऑनलाईन परीक्षा घेणे – 10 जानेवारी 2023 ते 20 जानेवारी 2023
 
4) ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 30 जानेवारी 2023 पर्यंत
 
5) शारीरिक चाचणी परीक्षा – 10 फेब्रुवारी 2023 ते 20 फेब्रुवारी 2023 
 
6) अंतिम निवड सूची जाहीर करणे – 28 फेब्रुवारी 2023 
 
7) नियुक्ती आदेश निर्गमित करणे – 5 मार्च 2023

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

वन विभाग भरती वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा  

offer


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

वन विभाग,

महाराष्ट्र वन विभाग भरती वेळापत्रक,

Maha Forest Guard Vanrakshak Bharti 2022 Maharashtra,

Van Vibhag Bharti 2023 Time Table Schedule,

वन विभाग भरती 2022 – 23 वेळापत्रक,

Maharashtra Van Vibhag Bharti Time Table

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.