खुशखबर! नव्या तलाठ्यांना उमेदवारांना मिळणार लवकरच नियुक्तीपत्रे!

Talathi Recruitment 2024

0

Talathi Recruitment 2024

बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील निवड झालेल्या ज्या उमेदवारांची जिल्हा निवड समितीकडून चारित्र्य, वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे, अशा सुमारे एक हजार उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. तसेच या नवनियुक्त तलाठ्यांना निवडपणक कामकाजातळी महभागी करून घेतले जाणार आहे. तलाठी परीक्षेतील २३ जिल्ह्यांमधील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी २३ जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील ज्या उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी पूर्ण झाली आहे. अशा उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना मिळणार नियुक्तीपत्रे जिल्ह्यातील तलाठी संवर्गातील ११८ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. २४ जानेवारी रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. निवड यादीतील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पहिल्या टप्यात नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितले. काही उमेदवारांची चौकशी सुरू असल्याने त्यांचे नियुक्तपत्र देण्याचे थांबवण्यात ) आले आहे. तलाठी पदभरतीच्या निवड यादीतील उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत 5 आहे. ११८ जागांसाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. मात्र, अद्याप उमेदवारांना प्रशासनाकडून नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. 

तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यानंतर प्रश्न-उत्तरांबाबत आक्षेप मागवण्यात आले आणि त्यांचे निराकरण करण्यात आले. ही सर्व पकिया केल्यानंतर तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. भरतीचा पुढील टप्पा म्हणून २३ जानेवारी रोजी राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम परभणी बीड लातर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली, अशा २३ जिल्ह्यांमधील निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. १ फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली. त्यानुसार आचारसंहिता लागण्यापूर्वी सुमारे एक हजार नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित पत्रे आचारसंहितेनंतर दिल्ली जाणार आहेत

तलाठी भरतीमधील निवड समितीच्या यादीत असलेल्या सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. राखीव जागेवरील उमेदवारांचे जात प्रमाणपत्र, तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या तपासणीसाठी समाजकल्याण विभागास प्रशासनाकडून पत्र देण्यात आले आहे, तसेच उमेदवारांची चारित्र्य पडताळणी करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे, तसेच उमेदवारांच्या आरोग्य तपासणीच्या अहवालासह इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झालेले आहे. बायोमॅट्रीक पडताळणीस अनुपस्थित राहिलेल्या काही उमेदवार इतर ठिकाणी रूजू आहेत.

कागदपत्रांची तपासणी सुरू
तलाठी भरतीमधील निवड समितीच्या यादीत असलेल्या सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. राखीव जागेवरील उमेदवारांचे जात प्रमाणपत्र, तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या तपासणीसाठी समाजकल्याण विभागास प्रशासनाकडून पत्र देण्यात आले आहे, तसेच उमेदवारांची चारित्र्य पडताळणी करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे, तसेच उमेदवारांच्या आरोग्य तपासणीच्या अहवालासह इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.