पुणे विद्यापीठाच्या १११ पदांसाठी तब्बल ४ हजार अर्ज!!

Pune University Bharti 2024

0

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विविध विभागांतील रिक्त असलेल्या १११ पदांसाठी प्राध्यापकांची भरती राबविली जात असून, १५ जानेवारीपर्यंत तब्बल ४ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. येत्या ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे. यामध्ये सुमारे ५ हजार पात्र उमेदवारांचे अर्ज प्राप्त होतील, असा अंदाज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

विद्यापीठातील प्राध्यापक पदाच्या भरतीची अनेक उमेदवार प्रतीक्षा करत होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. हजारो विद्यार्थी विद्यापीठाकडे अर्ज करणार असल्याची कल्पना विद्यापीठाला होती. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रासह इतरही राज्यांतील उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

डॉ. गोसावी म्हणाले, विद्यापीठाकडे आतापर्यंत ३ हजार ८९० उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यातील ६३५ उमेदवारांनी अर्ज भरून सबमिट केले आहेत. त्यातील ४५७ उमेदवारांनी अर्जासह शुल्कही जमा केले आहे. तसेच येत्या ३१ जानेवारीपर्यंत विद्यापीठाकडे ५ हजार अर्ज जमा होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाला गुणवत्ताधारक उमेदवार मिळावेत या दृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे.

Pune University Bharti 2024: Savitribai Phule Pune University – Applications are invited for the vacant posts of “Professor, Associate Professor, Assistant Professor”. There are total of 111 vacancies are available. The job location for this recruitment is Pune. Application is to be made through offline/online mode. Candidates should apply online from 01st of January to 31st of January 2024 and the last date for submitting hard copy of application in the University Office is 12th of February 2024. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे. तसेच, अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
  • पदसंख्या – 111 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याचा पत्ता – सहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 411007
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2024
  • अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीख – 12 फेब्रुवारी 2024

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.