शिक्षक भरतीच्या नियमांत बदल, राज्य सरकारने जाहीर केल्या नवीन सुधारणा..

पवित्र पोर्टल शिक्षक भरती बद्दल नवीन GR प्रकाशित!

0

राज्यातील शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरती करताना सर्वांना समान संधी मिळावी व गुणवत्ताधारक शिक्षक मिळावे, यासाठी राज्य सरकारने शिक्षक भरतीत नवीन सुधारणा केल्या आहेत.

राज्यात शिक्षकांची भरती करण्यासाठी सरकारने ‘पवित्र’ पोर्टल सुरु केले आहे. आगामी काळात शिक्षक भरती करताना या पोर्टलच्या कार्यपद्धतीत बदल केले जाणार आहेत. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत गुण सुधारण्यासाठी उमेदवारांना जास्तीत जास्त पाच वेळा संधी दिली जात होती. आता त्यात आणखी नवीन नियमांची भर पडली आहे. याबाबत राज्य सरकारने परिपत्रक जारी केलं आहे.

शिक्षक भरतीच्या नियमांत बदल

▪️उमेदवाराला आता प्रत्येक वेळी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी द्यावी लागेल.
▪️उमेदवाराचे पूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

▪️शिक्षक भरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेतले जाईल.
▪️2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी शिथिल केले आहे.

▪️शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देण्यासाठी उमेदवाराने किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य आहे. या चाचणीसाठी उमेदवारांनी निवडलेले माध्यम केवळ त्या चाचणीसाठी असेल.

▪️चाचणीनंतर भरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती देण्यात येतील.  त्या-त्या कालावधीतील जाहिरातीसाठी पात्र उमेदवारांकडून एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

▪️विविध टप्प्यांमध्ये जाहिरात येणार असल्याने, उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र असेल.

Pavitra Portal Shikshak Bharti 2022

Pavitra Portal Shikshak Bharti 2022 : शिक्षक भरतीचा नवीन जीआर महाराष्ट्र सरकारने 2022 प्रकाशित केला आहे. या GR बद्दल तपशील खाली दिलेला आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti 2022
   Pavitra Portal Shikshak Bharti 2022

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी कृपया दिलेली PDF वाचावी.

GR Download  करा   

 

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

शिक्षक भरती,
शिक्षक भरतीच्या नियमांत बदल,
Pavitra Portal,
Pavitra Portal Shikshak Bharti 2022,
Shikshak Bharti 2022 Update,

पवित्र पोर्टल शिक्षक भरती नवीन GR,

पवित्र पोर्टल शिक्षक भरती,

शिक्षक भरती 2022

Leave A Reply

Your email address will not be published.