MPSC च्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा | MPSC Recruitment 2021

0

MPSC Recruitment 2021

‘शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून पद भरतीसाठी सूट द्यावी असेही निर्देश पवार यांनी दिले आहेत.

‘करोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आली आहे. दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला निर्बंध लावण्यात आले होते. मात्र विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदासह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून सूट देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक १५ ऑगस्टपर्यंत संबंधित विभागांनी ‘एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यामुळे ‘एमपीएससी’ ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

MPSC Joint Director Recruitment Interview Date

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहसंचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, गट-अ पदभरती करिता मुलाखतीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. सहसंचालक पदाच्या मुलाखती 5 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.

  • पदाचे नाव – सहसंचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, गट-अ
  • मुलाखतीची तारीख – 5 ऑगस्ट 2021
  • मुलाखतीचा पत्ता – रवि भवन, शासकीय विश्रामगृह, सिव्हील लाईन्स, नागपूर – 440001

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.