TET Exam 2021: TET परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल; येथे बघा नवीन तारीख

MahaTET 2021 Update

0

MahaTET 2021 Update :  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी-२०२१) वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. या आधीच्या वेळापत्रकानुसार ३० ऑक्टोबर रोजी होणारी ही परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल करण्यात आल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून असंतोष व्यक्त होत आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१’चे आयोजन ३० ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. परंतु या तारखेला देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक आहे. ही बाब विचारात घेऊन ‘टिईटी’ परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

TET Exam Revised Timetable 

  • कार्यवाही : कालावधी
  • प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : २६ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-एक : २१ नोव्हेंबर (वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी १)-
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-दोन : २१ नोव्हेंबर (वेळ : दुपारी २ ते सायंकाळी ४.३०)


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.