TET च्या तारखेत बदल, सुधारित वेळापत्रक जाहीर

0

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख ही यूपीएससी परीक्षेशी क्लॅश होत होती, त्यामुळे टीईटीची तारीख बदलण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या दिवशीच शिक्षक पात्रता परीक्षा (TET) होत असल्याने तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच अखेरीस ‘टीईटी’चे सुधारित नियोजन (TET revised date) जाहीर झाले आहे.

टीईटी आता १० ऑक्टोबरऐवजी आता ३१ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून, त्यासाठी १४ ऑक्टोबरपासून उमेदवारांना हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे.  परिषदेने टीईटीची सुधारित तारीख जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र, शिष्यवृत्तीपाठोपाठ टीईटी परीक्षेच्या तारखेतही बदल करण्याची वेळ परिषदेवर आली आहे. करोनानंतर इतर शासकीय परीक्षांमुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल झाले होते. आता टीईटीबाबतही तशीच स्थिती आहे. परंतु, आता नियोजित ३१ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा घेण्यात यावी. त्यामध्ये कोणताही बदल करू नये, अशी मागणी उमेदवारांमधून केली जात आहे. दरम्यान, परीक्षा लांबणीवर गेल्याने अंतिम टप्प्यातील सरावासाठी अवधी मिळाल्याने उमेदवारांमध्ये समाधानही व्यक्त होत आहे.

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 26

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.