12 वी चा निकाल आज होणार जाहीर ! – Maharashtra HSC Result 2021

1

Maharashtra HSC Results 2021 | HSC Name Wise Result 2021 | HSC School wise Results 2021

Maharashtra HSC Result 2021- Result Date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी ०३ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर होणार आहे. सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा निकाल बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तसेच दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या वेटेजवर तयार करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेआधी मिळालेल्या सीट नंबरनुसार निकाल पाहता येणार आहे. गेले अनेक दिवस राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. विद्यार्थ्यांचे पुढील पदवी प्रवेश किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश या निकालावर अवलंबून असल्याने या निकालाकडे त्यांचे लक्ष लागून राहिले होते.

विद्यार्थ्यांना परीक्षेआधी मिळालेल्या सीट नंबरनुसार निकाल पाहता येणार आहे. गेले अनेक दिवस राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. विद्यार्थ्यांचे पुढील पदवी प्रवेश किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश या निकालावर अवलंबून असल्याने या निकालाकडे त्यांचे लक्ष लागून राहिले होते.

⚡ बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचा तपशील 👇

1.  https://hscresult.11thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org

4. mahresult.nic.in

www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

निकाल कसा लावणार

इयत्ता 10 वीच्या गुणांना 30 टक्के भारांश

  • दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.

इयत्ता अकरावी 30 टक्के भारांश

  • इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण

इयत्ता बारावीसाठी 40 टक्के भारांश

  • बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील
1 Comment
  1. Gopal Chavan says

    Gopal chavan

Leave A Reply

Your email address will not be published.