पहिली ऑनलाइन टीईटी परीक्षा फेब्रुवारीत होणार

Maha TET Exam 2024

0

Maha TET Exam 2024 Update

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) तयारी अंतिम टप्यात असून, येत्या फेब्रुवारीत पहिली ऑनलाइन टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेच्या जाहिरातीचे काम पूर्ण झाले असून, अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे.

शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. त्यातच आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी २०२४ मध्ये पहिली ऑनलाइन टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. आतापर्यंतच्या सर्व परीक्षा ऑफलाइन अर्थात ओएमआर शीटवर घेतल्या जात होत्या; परंतु इतर परीक्षेप्रमाणे टीईटीसुद्धा आता ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यामुळे सध्या परीक्षेच्या तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत. तसेच ऑनलाइन परीक्षेसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रांच्या तारखा मिळवण्याचे काम सुरू आहे. अनेक पदांच्या भरतीच्या ऑनलाइन परीक्षा घेतल्या जात आहेत. तसेच मार्च महिन्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीतच टीईटी परीक्षा घ्यावी लागणार असल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली.

Maha TET Exam 2024: The Teacher Eligibility Test or ‘TET’ which was conducted offline by the Maharashtra State Examination Council will henceforth be conducted online. Sources expressed the possibility that the notification of teacher eligibility test will be announced soon. The online examination will be conducted for the first time in February 2024.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परी- क्षेचे (टीईटी) अर्ज जानेवारीत घेतले जाणार आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात पहिली ऑनलाईन टीईटी परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. चार वर्षांच्या कालावधीनंतर शिक्षण विभागाकडून ही टीईटी घेतली जाणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया आणि त्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे समजते. 

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ऑफलाइन घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’ यापुढे ऑनलाइन घेण्यात येणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची अधिसूचना लवकरच जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. फेब्रुवारी २०२४ मध्ये संबंधित ऑनलाइन परीक्षेचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात येणार आहे. 

काय आहेत ऑनलाईन परीक्षेचे फायदे..

  • टीईटी वेळेत घेऊन निकाल लवकर जाहीर करण्यास होणार मदत
  • परीक्षेतील गैरप्रकारांना पूर्ण आळा बसणार
  • परीक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळाचा वापर कमी होणार
  • परीक्षा पारदर्शक होण्यास मदत होणार
  • ऑफलाईन परीक्षेत होत असलेल्या चुका टाळण्यास होणार मदत

आयबीपीएस आयटी कंपनीमार्फत संबंधित परीक्षा घेण्याची निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्‍यांनी दिली. प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात (टीईटी) पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या वर्गासाठी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम अनुदानित, कायम विनाअनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षकपदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते.

गेल्या दोन वर्षांत टीईटीमध्ये गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या कारभारावर संशय निर्माण झाला होता. अनेकांना नोकरीपासून वंचित राहावे लागले आहे. यापुढे गैरव्यवहार होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आता शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन घेण्याची तयारी सुरू केली आहे.

गेल्या दोन वर्षांत टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली नाही. मुळातच टीईटी परीक्षेत अनेक बोगस उमेदवार सापडले असताना त्यांच्यावर अद्याप कठोर कारवाई केली गेली नाही. शासन जानेवारी अधिसूचना जाहीर करून फेब्रुवारी २०२४ ला पुन्हा एकदा शिक्षक पात्रता परीक्षा घेणार आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.