पॉलिटेक्निकसाठी प्रवेशप्रक्रिया अर्जनोंदणी आजपासून; २ जुलैला पहिली गुणवत्ता यादी !

DTE Maharashtra Polytechnic Admission 2024

0

DTE Maharashtra Polytechnic Admission 2024 

हावीचा निकाल लागल्यानंतर, बुधवारी २९ मेपासून पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीनंतर तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम असून सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल या शाखांसाठी प्रवेश घेता येईल.

निकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल या शाखांसाठी प्रवेश घेता येईल. या प्रवेशप्रक्रियेचा तपशील, ऑनलाइन अर्ज https:// dte.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध होईल. तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत तंत्रनिकेतन पदविका (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला दहावीचा निकाल जाहीर होताच प्रारंभ होणार आहे. राज्यात यंदा ३००हून अधिक संस्थांमध्ये सुमारे १ लाखाहून अधिक प्रवेशक्षमता आहे. या जागावर प्रवेश करण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे. याचवेळी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे.

राज्यभरात ३००हून अधिक संस्थांमध्ये १ लारवाहून अधिक प्रवेशक्षमतापदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया करता येणार आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रम शिकण्यासाठी मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) पर्यायही आहे. यामधून ३३ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी या दोन्ही भाषेतून शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला होता. तंत्रशिक्षणातील पदविका हा रोजगारक्षम अभ्यासक्रम म्हणून एक उत्तम पर्याय ठरत असल्याने दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांनी गतवर्षी अभ्यासक्रमांना पसंती दर्शवली होती. गतवर्षी ८६ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. मॅकेनिकल इंजिनिअरिंग, कम्युटर इंजिनियरिंग, सिव्हिल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग आदी अभ्यासक्रमांना मोठी पसंती दर्शवली होती. विद्यार्थ्यांना प्रवेश फेरी दरम्यान कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि जागा स्वीकृतीसाठी एआरसी केंद्राकडे जाण्याची यावर्षी गरज नाही. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यानंतर दिलेला प्रवेश हा नियमांनुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वतः लॉगिन मधून करता येणार आहे. जागा स्वीकृतीची कार्यवाहीसाठी लॉगीनमधून पूर्ण करण्याची सुविधाही असणार आहे.

DTE Poly Admission Time Table 2024

महाराष्ट्र राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील पदविका अभ्यासक्रमांची शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) लवकरच सुरू करण्यात येणार असून प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक संचालनालयाद्वारे लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने इयत्ता १०वी नंतरच्या अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / वास्तुकला पदविका अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्र (FC) म्हणून नियुक्त केलेल्या संस्थांची यादी सोबत जोडली आहे.
सुविधा केंद्रांच्या सर्व प्राचार्यांनी / संचालकांनी इयत्ता १०वी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी आणि द्वित्तीय वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी आवश्यक मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
सुविधा केंद्रांकडे सोबतच्या प्रपत्र “अ” नुसार किमान आवश्यक सुविधा आवश्यक राहतील. तसेच प्रपत्र “ब” मध्ये सुविधा केंद्रांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या नमूद केलेल्या आहेत. त्याप्रमाणे व वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांप्रमाणे जबाबदारीने, सचोटीने व अचूकपणे कर्तव्ये पार पाडावीत.
सुविधा केंद्र प्रमुखांना कळविण्यात येते की, ऑनलाईन अर्ज भरणे सुरू होण्यापूर्वी सोबतच्या प्रपत्र “अ” नुसार सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सहजतेने पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रथम व द्वितीय वर्षासाठी स्वतंत्र सुविधा केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.
या संचालनालयातील डॉ. उमेश कोकाटे, प्रणाली व्यवस्थापक हे सुविधा केंद्रांसाठी मुख्य समन्वयक म्हणून काम पाहतील. सुविधा केंद्र प्रमुख यांनी अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी ०२२-६८५९७४५९/६८५९७४६५/६८५९७४६९/ ६८५९७४६६/६८५९७४९२/६८५९७४६८ या दूरध्वनींवर संपर्क साधावा.
टीपः – प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार सर्व सुविधा केंद्रे स.१०.०० ते सायं. ६.०० पर्यंत (सुट्टीसहित) सुरु राहतील.

दि.२९ मे ते २५ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जनोंदणी, पडताळणी व अर्ज निश्चिती करावी लागणार आहे. याच कालावधीत अर्जाची छाननी होणार आहे. अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. दि. २७ जून रोजी तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत..

दि. २८ ते ३० जून या कालावधीत तात्पुरत्या याद्यांमध्ये तक्रार नोंदवता येतील

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.