१० वी पास तरुणांसाठी बातमी-CRPF परीक्षा आता मराठीतून देता येणार , 9221 पदांची भरती सुरु! – CRPF Recruitment 2023

CRPF Recruitment 2023

0

CRPF Recruitment 2023

CRPF Recruitment 2023 : आता CRPF भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी भाषेत तयार केली जाईल.

केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. यासाठी गृह मंत्रालयाने CRPF मध्ये 1.30 लाख कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. CRPF मध्ये थेट भरतीद्वारे लेव्हल 3 पदे भरली जातील. यासंदर्भातील डिटेल्स अधिसूचना लवकरच CRPF च्या crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. 

गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेतून परीक्षेत भाग घेता येणार आहे. त्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढणार आहे. कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे आयोजित प्रमुख परीक्षांपैकी एक आहे. ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार भाग घेतात. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, 1 जानेवारी 2024 पासून 13 प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. गृह मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालय प्रादेशिक भाषांच्या वापर आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे.

किती जागांसाठी होणार भरती?
मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, एकूण 129929 पदांची भरती केली जाईल, त्यापैकी 125262 पदे पुरुष उमेदवारांसाठी आणि 4467 पदे महिला उमेदवारांसाठी आहेत. कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी 10 टक्के रिक्त जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असणार आहेत.

 

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा माजी लष्करी कर्मचार्‍यांच्या बाबतीत समकक्ष लष्करी पात्रता असावी. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावी.

 

विशेष म्हणजे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून CRPF भरती परीक्षा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचे आवाहन केले होते. स्टॅलिन यांनी या भरती परीक्षेत ‘बेसिक हिंदी अंडरस्टँडिंग’साठी ठेवलेल्या 25 टक्के गुणांची तक्रार केली होती.

तमिळसोबत इतर प्रादेशिक भाषांनाही त्यात ठेवायला हवे. यामुळे तामिळनाडूतील तरुणांची सीआरपीएफ नोकरीसाठी निवड होण्याची शक्यता कमी झाली आहे, असे स्टॅलिन म्हणाले होते. तसेच, स्टॅलिन यांनी यासंदर्भात अमित शहांना सांगितले की, उमेदवारांना तमिळ आणि इतर भाषांमध्येही परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी.

 

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी चाचणीद्वारे केली जाईल. पुढील प्रक्रियेसाठी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

 

वेतन
ज्या उमेदवारांची कॉन्स्टेबल पदांवर निवड झाली आहे आणि 2 वर्षांचा प्रोबेशन कालावधी ओलांडला आहे, त्यांना 21700 रुपये ते 69100 रुपये वेतन दिले जाईल.

अधिक माहिती : अर्ज प्रक्रियेच्या तारखा अद्याप अधिकृत अधिसूचनेत दिल्या नाहीत. मंत्रालयाकडून अधिकृत तपशीलवार अधिसूचना जारी झाल्यानंतर तुम्ही CRPF शी संबंधित अधिक माहित तपासू शकता.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF नवीन GR प्रकाशित

CRPF Recruitment 2023

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत “हवालदार पदांच्या एकूण  ९२१२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक २७ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ आहे.

एकूण जागा : 9212

पदाचे नाव & तपशील: कॉन्स्टेबल

शैक्षणिक पात्रता: १० वी पास, शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ एप्रिल २०२३ 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

CRPF,

केंद्रीय राखीव पोलीस दल,

CRPF Recruitment 2023

 

Leave A Reply

Your email address will not be published.