बांधकाम उद्योगात भरतीचे प्रमाण ८६ टक्क्यांनी वाढले

Construction Sector Jobs

0

Construction Sector Jobs

Construction Sector Jobs – गेल्या वर्षभरात देशातील बांधकाम उद्योगात आलेल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर आता बांधकाम उद्योगातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होत असल्याचे दिसून येत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात या क्षेत्रातील भरतीचे प्रमाण ८६ टक्क्यांनी वाढल्याची माहिती आहे.

बांधकाम क्षेत्रातील एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, बांधकाम क्षेत्रातील या रोजगारामध्ये दिल्ली शहराने पहिला क्रमांक गाठला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर बंगळुरू शहर आहे. मुंबई शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ मुंबईच नव्हे तर एकूणच महामुंबई परिसरात देखील गेल्या वर्षभरात नव्या प्रकल्पांची सुरुवात झाली आहे. त्यामुळे चालू वर्षात या परिसरात बांधकाम क्षेत्रातील नोकऱ्यांत वाढ होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे या प्रमुख शहरांखालोखाल लखनौ, एर्नाकुलम, कोची, कॅलिकट अशा द्वितीय श्रेणी शहरांतदेखील मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प साकारले जात असून, तिथे मोठ्या प्रमाणावर भरती होताना दिसत आहे. प्रत्यक्ष बांधकाम करणाऱ्या मजुरांपासून ते वास्तुविशारद, सिव्हिल इंजिनियर्स, डिझायनर्स, ड्राफ्ट्समन अशा सर्व विभागांमध्ये ही भरती होताना दिसत आहे. सर्वाधिक २५ टक्के भरती ही इंजिनियरिंग विभागात होत आहे. प्रकल्प मुख्याधिकारी सुपरवायझरपदासाठी आणि बांधकाम कंपन्यांतर्फे प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या दहा वर्षांत देशातील बांधकाम उद्योगात तीन कोटी लोकांना नव्याने रोजगार मिळाला आहे

 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.