भूमि अभिलेख अपडेट- १ हजार २५० भूकरमापक सेवेत रुजू होणार, नियुक्ती पत्र “या” तारखेला मिळणार
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2023
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2023
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2023 : जमिनीची मोजणी करणाऱ्या भूकरमापक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे येत्या मे महिन्यापासून १ हजार २५० भूकरमापक सेवेत रुजू होणार आहेत. या प्रक्रियेमुळे राज्यातील प्रलंबित जमीन मोजणीला वेग येणार आहे. भूमी अभिलेख विभागांतर्गत जमिनींच्या मोजणीचे काम करण्यात येते. जमीन मोजणीचे काम करणाऱ्या भूकरमापकांची राज्यात पदे रिक्त आहेत. राज्यातील भूमी अभिलेख विभागात विविध प्रकारची एकूण चार हजार पदे आहेत. त्यापैकी भूकरमापकांची दीड हजार पदे रिक्त आहेत.
भूमिअभिलेख विभागांतर्गत विविध पदांवरील कर्मचाऱ्यांमार्फत फेरफार उतारा, तसेच जमिनीच्या नोंदी, मोजणी याचे काम करण्यात येते. जमीन मोजणीचे काम करणाऱ्या भूकरमापकांची राज्यात पदे रिक्त आहेत. राज्यातील भूमिअभिलेख विभागात विविध प्रकारची एकूण चार हजार पदे आहेत. त्यापैकी भूकरमापकांची दीड हजार पदे रिक्त आहेत. यातील १ हजार २५० पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे जमिनीच्या मोजणीच्या कामांना वेग येत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे.
– आनंद रायते, अतिरिक्त आयुक्त, जमाबंदी विभाग
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
भूमि अभिलेख अपडेट