नमो रोजगार मेळाव्यात 43,613 जागांवर पदभरती होणार

Baramati Namo Rojgar Melava

0

Baramati Namo Rojgar Melava

Baramati Namo Rojgar Melava – येथे होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्यामध्ये तब्बल 311 उद्योजक सहभागी होणार असून 43 हजार 613 जागांवर पदभरती केली जाणार आहे, अशी माहिती बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली. बारामतीत नमोरोजगार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. येत्या बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यात 43,613 जागांवर पदभरती होणार होणा-या या मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांची विविध दालने असून मुलाखती घेऊन जागेवरच नियुक्तीपत्र देण्याचा विविध कंपन्यांचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन दोन मार्च रोजी सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठान संकुलातील मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या मेळाव्यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, सांगली परिसरातून युवक येणार आहेत. दोन दिवस हा रोजगार मेळावा सुरू राहणार आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चहापान, भोजन व नाश्त्याची सोय राज्य शासनामार्फत मोफत केली जाणार असल्याचेही वैभव नावडकर यांनी सांगितले. दरम्यान या मेळाव्यासाठी येणाऱ्या युवकांना कोणतीही गैरसोय सहन करावी लागू नये, या उद्देशाने आज बारामतीत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, वैभव नावडकर, गणेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बारामतीतील हा मेळावा उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी सूचना दिल्या आहेत. आजपर्यंत या मेळाव्यासाठी 14000 हून अधिक युवकांनी नोंदणी केली आहे. ऑनलाइन नोंदणी न करणा-या युवकांना जागेवर आल्यानंतर देखील या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.

विविध विभागांमधील पदवीधर विद्यार्थी या मेळाव्यामध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात. या मेळाव्या दरम्यान करियर मार्गदर्शनाचे चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पदवीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करता येऊ शकते याबाबतचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करणार आहेत.

या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या लिंकवर जावून नोंदणी करावी आणि नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नियोक्तांसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.