आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी अपडेट जाहीर!

Arogya Vibhag Answer Key 2023

0

आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा राज्यातील २९ जिल्हयामध्ये १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती. परिक्षा झाल्यानंतर मे. टि.सी.एस.- आय.ओ.एन. यांचेकडून दि.१५-१२-२०२३ पासून संबंधित उमेदवाराच्या लॉगिन आय.डी. वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात आली होती. उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.१८-१२-२०२३ ते दि.२०-१२-२०२३ या कालावधीत टि.सी.एस. कडून लिंक खुली करून देण्यात आली होती.

 

सदर प्राप्त आक्षेपांबाबत टीसीएस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करणेत येऊन ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप / हरकत समितीमार्फत स्विकृत झालेत त्या पदांच्या अंतिम ( Answer Key) उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या (Log in) लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यापुर्वीच प्रसिध्द केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी Normalization सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिध्द होईल.

आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा-२०२३ राज्यातील २९ जिल्हयामध्ये १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ या तारखांना आयोजित करण्यात आलेली आहे. परिक्षा झाल्यानंतर मे. टि.सी.एस. आय.ओ.एन. यांचेकडून दि.१५/१२/२०२३ पासून संबंधित उमेदवाराच्या लॉगिन आय.डी. वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यावर संबंधित उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.१८-१२-२०२३ ते दि.२०-१२-२०२३ या कालावधीत टि.सी.एस. कडून उमेदवारांच्या लॉगिन अकाऊंट वरुन लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात व त्यानंतर ईमेलव्दारे, लेखी अथवा अन्य मार्गाने प्राप्त झालेल्या / होणा-या आक्षेप/हरकतींचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांच्या केवळ लॉगिन अकाऊंट लिंकवरुन प्राप्त झालेल्या आक्षेप / हरकतीची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर प्राप्त आक्षेपांबाबत टीसीएस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करणेत येऊन उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडीवर माहिती उपलब्ध करून देणेत येणार आहे. ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप / हरकत समितीमार्फत स्विकृत झालेत त्या पदांच्या सुधारित (Answer Key) उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या (Log in) लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यास्तव वर नमूद केलेप्रमाणे विहीत कालावधीमध्ये केलेल्या लॉगिन अकाऊंट वरील आक्षेप/हरकतीव्यतिरिक्त कोणतेही आक्षेप / हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

आत्ताच प्राप्त अपडेट नुसार आरोग्य विभागाची फायनल रिस्पॉन्स शीट(उत्तरतालिका) लवकरच १-२ दिवसात जाहीर होणे अपेक्षित आहे


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.